मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
लघुवज्रासन **

लघुवज्रासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ५१३)
लघु म्हणजे लहान, सोपा त्याचप्रमाणे सुंदर. वज्र म्हणजे देवांचा राजा इंद्र याचे शस्त्र.

पध्दती
१. गुडघे व पावले जुळवून जमिनीवर गुडघे टेका. तळहात कंबरेवर ठेवा (चित्र क्र.४०).
२. श्वास सोडा. पाठीच्या कण्याची मागच्या बाजूला कमान करा व त्याचवेळी मांडयांचे स्नायू घट्ट आवळा. (चित्र क्र. ५०८ व ५०९)
३. ढुंगण पुढे ढकला आणि टाळू पावलांवर टेकली जाईपर्यंत पाठीचा कणा वाकवीत रहा. यासाठी आवश्यक असलेला लवचिकपणा पाठीच्या कण्यामध्ये येण्यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता असते. यावेळी शरीराचा भार फक्त गुडघ्यांवर येतो.
४. वरील स्थिती मान्य झाली म्हणजे कंबरेवरुन हात उचला. खांद्यापासून हात सरळ पुढे ताणा आणि हातांनी गुडघे पकडा. (चित्र क्र.५१३)
५. पाठीचा कणा ताणला गेल्यामुळे आणि पोटावर दाब आल्यामुळे श्वसन जलद आणि अवघड होईल. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १० ते १५ सेकंद राहाण्याचा प्रयत्न करा.
६. श्वास सोडा. गुडघे स्थिर ठेवा. गुडघे टेकलेल्या अवस्थेत येण्यासाठी डोके आणि धड वर उचला. त्यानंतर जमिनीवर बसा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामुळे पाठीच्या कण्यातील मज्जा सुदृढ बनतात व त्रिकास्थीला व्यायाम घडतो. हे आसन नियमित केल्यामुळे पाठीच्या कण्यातील खालच्या भागातील वेदना नाहीशा होतात व मणक्यांची विस्थापनाही नाहीशी होते. पाठीच्या कमानीमुळे पोटाचे स्नायू आणि छाती पूर्णपणे फुगविली जाते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP