मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
तोलासन *

तोलासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १०८)
तोल म्हणजे तराजू. हे आसन तराजूच्या एका पारडयासारखे दिसते म्हणून हे नाव दिले गेले आहे.

पध्दती
१. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४)
२. तळहात पुठ्ठयाशेजारी जमिनीवर ठेवा. श्वास सोडा. धड वर उचला आणि हात ताठ करुन सर्व शरीर हातावर तोला. (चित्र क्र. १०८)
३. जमिनीवर बसा. मांडी बदला आणि पुन्हा हातांवर शरीर तोलून धरा. शक्य तितका अधिक वेळ या स्थितीत रहा.

परिणाम
या आसनामुळे मनगटे, हात आणि पोटाचे स्नायू सशक्त बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP