मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
गर्भपिंडासन *

गर्भपिंडासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ११६)
पद्मासनाच्या या प्रकारात हात आणि दंड मांडी-पोटरीच्या मध्ये कोपरे वाकेपर्यंत घुसवा. नंतर हात वाकवून हाताचे पंजे कानाजवळ आणा. हे आसन गर्भाशयात असलेल्या मानवी गर्भासारखे दिसते. फरक इतकाच की गर्भाशयातील देहाचे डोके खाली असून पाय वर असतात व त्याची मांडी घातलेली नसते. प्राचीन ऋषींच्या जवळील वैद्यकीय साधने अपुरी असूनही मातेच्या गर्भाशयामध्ये मानवी गर्भाची वाढ कशी होते हे त्यांना माहीत होते, हे ह्या आसनाला दिलेल्या नावावरुन सूचित होते.

पध्दती.
१. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४)
२. मांडया-पोटर्‍यांमधील पोकळीमध्ये एक एक हात सरकवा.
३. कोपरे सहज वाकू शकतील इतक्या प्रमाणात हात पुढे घुसवा.
४. नंतर श्वास सोडा आणि मांडया जमिनीवरुन उचला. शरीर गुदास्थीवर तोलून धरा. बोटांनी कान पकडा. (चित्र क्र. ११६)
५. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १५ ते ३० सेकंद राहा. पाय हळूहळू खाली घ्या. पायांमधून प्रथम एक हात व नंतर दुसरा हात मोकळा करा. पाय लांब करा आणि विसावा घ्या.
६. मांडी बदलून हे आसन पुन्हा करा.

परिणाम
या आसनात पोटातील अवयव पूर्णपणे आकुंचित केले जातात व त्यांच्याभोवती रक्ताभिसरण चांगल्या तर्‍हेने होऊ लागते. त्यामुळे हे अवयव सुस्थितीत राहतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP