मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सुप्त वज्रासन *

सुप्त वज्रासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १२४)
सुप्त म्हणजे निजलेला. वज्र म्हणजे, देवांचा राजा इंद्र याचे शस्त्र. हे आसन कठीण आहे आणि त्याच्यासाठी अतिशय चिकाटीने सराव करावा लागतो.

पध्दती
१. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४) नंतर बध्दपद्मासन करा. (चित्र क्र. ११८)
२. श्वास सोडा. गुडघे आणि मांडया जमिनीवरुन उचला आणि जमिनीवर मागे रेलून झोपा. (चित्र क्र. १२३) दोनदा श्वसन करा.
३. मान मागे ताणून टाळू जमिनीवर टेका. धड व छाती यांची वरच्या दिशेला कमान करा.
४. कोणत्याही वेळी आंगठयावरील पकड सैल न करता श्वास सोडा आणि गुडघे व मांडया जमिनीच्या दिशेने खाली न्या. (चित्र क्र. १२४) मग टाळू, कोपरे, पाठीमागच्या बाजूला आढी घातलेले हात आणि कुल्ले एवढेच शरीराचे भाग जमिनीला स्पर्श करतील.
५. या स्थितीत थोडे सेकंद राहा. श्वास सोडा. अंगठयावरील पकड सोडून द्या. पाठीमागे घातलेली हातांची आढी मोकळी करा आणि पुन्हा पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४) नंतर पाय लांबवा आणि विसावा घ्या.
६. मांडी बदला आणि हेच आसन पुन्हा करा.

परिणाम
पाठीच्या छातीमागील भाग या आसनामध्ये ताणला जातो आणि त्यामुळे छाती पूर्णपणे फुगवली जाते. मानेला ताण बसल्यामुळे कंठस्थ ग्रंथी निकोप बनतात. ओटीपोटातील जोड सांधे लवचिक बनतात. एकदा या आसनावर प्रभुत्व मिळाले म्हणजे मत्स्यायन (चित्र क्र. ११३) अगदी सोपे बनते.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP