मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
एकपाद राजकपोतासन २ **

एकपाद राजकपोतासन २ **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५४६)
पध्दती
१. दोन्ही पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र.७७)
२. बोटे मागे रोखलेली राहातील व डाव्या कुल्ल्याशी जमिनीला टेकतील अशा बेताने डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डाव्या पोटरीची आतली बाजू डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला लगटली पाहिजे आणि डावा गुडघा जमिनीला टेकलेला असला पाहिजे. डावा पाय आता वीरासनामध्ये राहील. (चित्र क्र. ८९)
३. उजवा पाय मागे घ्या आणि सगळाच्या सगळा पाय जमिनीवर असू द्या.
४. तळहात जमिनीवर ठेवा. श्वास सोडा. उजवा गुडघा वाकवा आणि उजवे पाऊल वर डोक्यापाशी न्या. गुडघ्यापासून घोटयापर्यंतची उजवी नडगी जमिनीशी काटकोनात असावी. ही स्थिती साधण्यासाठी उजव्या मांडीचे स्नायू आवळून धरा. काही वेळ श्वसन करा.
५. श्वास सोडा, कणा व मान लांबवा, डोके मागे झोका. डोक्यावरुन एकेक हात मागे नेऊन उजवे पाऊल पकडा आणि डोके त्यावर टेका. (चित्र क्र.५४६) सुमारे १५ सेकंद तोल सांभाळून स्थिर राहा. आणि नेहमीप्रमाणे श्वसन ठेवण्याचा यत्न करा.
६. उजव्या घोटयावरील पकड सोडा आणि पाय सरळ करा.
७. हे आसन दुसर्‍या बाजूस आधीच्या इतकाच वेळ पुन्हा करा. आता उजवा पाय वीरासनात असेल. डोक्यावरुन नेलेल्या दोन्ही हातांनी पकडलेल्या डाव्या पावलावर डोके टेकले जाईल.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP