मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
बध्द कोणासन *

बध्द कोणासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १०२)
बध्द म्हणजे पकडलेला किंवा आवर घातलेला. या आसनामध्ये जमिनीवर बसा. टाचा शिवणीजवळ आणा, पावले पकडा आणि गुडघे दोन्ही बाजूंना जमिनीला स्पर्शतील अशा तर्‍हेने मांडया फाका. भारतीय चर्मकार अशा पध्दतीने बसतात.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. गुडघे वाकवा आणि पावले धडाजवळ आणा.
३. पायांच्या टाचा आणि चवडे एकत्र जुळवा. बोटांनजीक पावले पकडून शिवणीजवळ आणा. दोन्ही पावलांची बाहेरची बाजू जमिनीला टेकलेली आणि टाचांची मागची बाजू शिवणीला लागून असावी.
४. मांडया फाका आणि गुढगे खाली आणीत ते जमिनीला स्पर्शू द्या.
५. हातांची बोटे एकमेकांत गुंफा. पावले घट्ट पकडा. पाठीचा कणा ताठ उभा ठेवा. आणि सरळ समोर पहात रहा किंवा नाकाच्या शेंडयावर नजर खिळवा. (चित्र क्र. १०१) या स्थितीत शक्य तितका अधिक वेळ रहा.
६. कोपरे मांडयांवर टेका आणि ती खाली दाबा. श्वास सोडा. पुढे वाका आणि प्रथम डोके, व शेवटी हनुवटी नंतर नाक जमिनीला टेका. (चित्र क्र. १०२) नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत अर्धे ते एक मिनिट राहा.
७. श्वास आत घ्या. जमिनीपासून धड वर उचला. क्र. ५ च्या स्थितीत या. (चित्र क्र. १०१)
८. नंतर पावले मोकळी करा. पाय सरळ लांबवा आणि विसावा घ्या.

परिणाम
ज्यांना मुत्रोत्सर्गाच्या बाबतीत त्रास होत असेल त्यांना हे आसन उपयुक्त आहे. ओटीपोट, पोट व पाठ या अवयवांमध्ये रक्ताचा भरपूर पुरवठा होतो व ती उत्तेजित होतात. मूत्रपिंड, प्रोस्टेट ग्रंथी आणि मूत्राशय निकोप राहतात. भारतीय चर्मकारांमध्ये मूत्रमार्गाचे रोग फार क्वचित आढळतात. याचे कारण ते सारा दिवस या आसनात बसलेले असतात. या आसनामुळे सायटीकाचे दुखणे कमी होते. आणि अंतर्गळ हा रोग होण्याचे टळते. जर हे आसन नियमितपणाने केले तर त्यामुळे वृषणातील कळा आणि त्यांचा अवजडपणा ही नाहीशी होतात. हे आसन म्हणजे स्त्रियांना या आसनाची शिफारस करण्यात आली आहे.) पद्‍मासन (चित्र क्र. १०४) आणि वीरासन (चित्र क्र. ८९) यांच्या बरोबर हे आसन प्राणायामाचा अभ्यास आणि ध्यान यांसाठी उपयुक मानले जाते. ध्यानासाठीं या अस्वस्थेत बसताना तळहात छातीसमोर जुळलेल असावेत. (चित्र क्र. १०३) परंतु पाठ ताठ ठेवून हे करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. डोके जमिनीवर टेकले नाही तर हे आसन जेवण झाल्यावर सुध्दा करण्यास काहीच हरकत नाही.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP