मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पार्श्वैकपाद शीर्षासन *

पार्श्वैकपाद शीर्षासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २१०)
पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू. एकपाद म्हणजे एक पाय. या आसनात एक पाय डोक्याच्या रेषेत एका बाजूला खाली नेऊन जमिनीवर टेकला जातो. त्याच वेळी दुसरा पाय सरळ वर उचललेला असतो.

पध्दती
१. आधी वर्णन केल्याप्रमाणे एकपाद शीर्षासन (चित्र क्र. २०८ आणि २०९) पूर्ण केल्यानंतर हे आसन करावे.
२. श्वास सोडा आणि उजवा पाय उजव्या बाजूला खाली न्या आणि डोक्याच्या सरळ रेषेत तो जमिनीवर टेका. (चित्र क्र. २१०) डावा पाय शीर्षासनातल्या प्रमाणे सरळ वर उभा ठेवा.
३. एकपाद शीर्षासन शीर्षासनातल्यापेक्षा या स्थितीमध्ये डोक्यावर स्थिर उभे राहाणे अधिक कठिण असते. या आसनात डोक्यावरील तोल सांभाळण्यासाठी दोन्ही मांडयांच्या मागच्या बाजूच्या स्नायूंना ताण द्या. गुडघे आणि खाली आणलेल्या पायाच्या बाजूकडील ओटीपोटाच्या भागानजीकचे मांडीचे जोडस्नायू घट्ट आवळून धरा.
४. दीर्घ श्वसन करीत या आसनात १० ते २० सेकंद राहा. गुडघ्याच्या मागच्या बाजूच्या शिरा आणि मांडया ताणा. श्वास सोडून उजवा पाय शीर्षासनाच्य स्थितीत न्या.
५. काही वेळ शीर्षासनात राहा. नंतर श्वास सोडा. डावा पाय बाजूने खाली नेऊन डोक्याच्या रेषेत येईल अशा रीतीने जमिनीवर टेका. आधीच्या इतकाच वेळ या स्थितीत राहा. नंतर श्वास सोडा. आणि पुन्हा शीर्षासनात या.
६. पाय खाली आणताना किंवा वर नेताना गुडघे वाकवू नका. नाहीतर तुमचा तोल जाईल.

परिणाम
या आसनामुळे मान, पोटाच्या भिंती आणि मांडया यांना बळकटी येते. आतडी आणि पाठीचा कणा हे सुधारतात आणि सुदृढ बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP