मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
वामदंडासन २ *

वामदंडासन २ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४६६)
पध्दती
१. जमिनीवर बसा आणि मांडया फाकवा.
२. डावी पोटरी डाव्या मांडीच्या मागच्या बाजूला स्पर्श करील अशा बेताने डावा गुडघा मागच्या बाजूला वाकवा.
३. डावी टाच डाव्या कंबरेच्या सांध्याला स्पर्श करील अशा बेताने डाव्या हाताने डावे पाऊल उचला. भेकासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. १००) डाव्या हाताने डावे पाऊल पकडा.
४. पद्मासनातल्याप्रमाणे (चित्र क्र.१०४) उजव्या हाताने उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा.
५. दोन्ही हातांचा उपयोग करुन दोन्ही पायांचे चवडे एकत्र करुन एकमेकाला भिडवा. (चित्र क्र. ४६६)
६. आता पद्मासनातल्याप्रमाणे धड पायाच्या बाजूकडे झूकेल. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून तोल सांभाळा. दीर्घ श्वसन करीत ही स्थिती ३० सेकंद टिकवून धरा.
७. हात आणि पाय मोकळे करा. उजवे पाऊल भेकासनामध्ये आणि डावे पाऊल पद्मासनामध्ये ठेवून हे आसन दुसर्‍या बाजूने पुन्हा करा. दोन्ही बाजूंकडील आसनांना सारखाच वेळ द्या.

परिणाम
या आसनामुळे पायांमधील वेदना व ताठरपणा नाहीसा होतो. जननेंद्रिये निरोगी राहातात. पाठीचा कणा सुदृढ होतो आणि पचनशक्ती सुधारते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP