मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सुप्तकोणासन *

सुप्तकोणासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


चित्र क्र. २४७)
सुप्त म्हणजे निजलेला. हलासनाच्या या प्रकारामध्ये पाय फाकवले जातात.

पध्दती
१. कर्णपीडासन (चित्र क्र. २४६) करुन पाय सरळ पुढे लांबवा. आणि पाय शक्य होतील तितके दूर फाकवा.
२. धड वर खेचा आणि गुडघे घट्ट आवळा.
३. उजव्या पायाचा आंगठा उजव्या हाताने आणि डाव्या पायाचा आंगठा डाव्या हाताने पकडा. टाचा वर ठेवा. आंगठे पकडल्यानंतर पाठीच्या कण्याचा छातीमागचा भाग आणखी वर न्या. आणि गुडघ्यामागच्या जोडस्नायूंना ताण द्या. (चित्र क्र. २४७ आणि २४८).
४. या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत २० ते ३० सेकंद राहा.

परिणाम
ह्या आसनामुळे पायांना सुदृढता येते आणि पोटातील अवयव आकुंचित होण्यास मदत होते.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP