सिंहासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ११०)
पध्दती
१. पद्मासनात बसा. (चित्र क्र. १०४)
२. हात पुढल्या बाजूस पसरा आणि बोटे पुढच्या दिशेस राहतील अशा तर्हेने तळहात जमिनीवर ठेवा.
३. गुडघे टेकून आणि ओटीपोटाचा भाग जमिनीच्या दिशेने ताणा.
४. कुल्ले आकुंचित करुन पाठ ताणून धरा. हात पूर्णपणे पसरलेले राहू द्या. आता शरीराचा भार फक्त तळहात आणि गुडघे यांवर सावरला जाईल. तोंड उघडा आणि जीभ बाहेर काढून ती हनुवटीच्या दिशेने शक्य तितकी अधिक ताणा. (पुढील दृश्य : चित्र क्र. ११०, बाजूकडील दृश्य : चित्र क्र. १११)
५. भुवयांच्या मध्यावर (स्थपनी जवळ) किंवा नाकाच्या शेंडयावर दृष्टी खिळवा व सुमारे ३० सेकंद या स्थितीत राहा. तोंडाने श्वसन करा.
६. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४) जमिनीवरुन हात उचला. मांडी बदलून पुन्हा पद्मासन करा आणि आधीइतकाच वेळ हे आसन पुन्हा करा.
परिणाम
या आसनामुळे यकृताला व्यायाम घडतो आणि पित्ताच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवले जाते आणि त्यामुळे श्वासाची दुर्गंधी नाहीशी होते. जीभ स्वच्छ होते. शब्दोच्चार स्पष्ट होऊ लागतात. त्यामुळे बोलताना चाचरणार्या व्यक्तींना हे आसन उपयुक्त ठरते. या आसनामुळे गुदास्थीतील वेदना कमी होतात. सरकलेली गुदास्थी योग्य जागी बसते.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP