उत्कटासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ४२)
उत्कट म्हणजे शक्तिमान, भीतिदायक किंवा उंचसखल. हे आसन काल्पनिक खुर्चीवर बसण्याप्रमाणे असते.
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १) हात डोक्यावर उभे धरा आणि तळहात जुळवा. (चित्र क्र. १२)
२. श्वास सोडा, गुडघे वाकवा आणि मांडया जमिनीशी समांतर होतील अशा तर्हेने धड वाकवा. (चित्र क्र. ४२)
३. पुढे वाकू नका. उलट छाती जितकी मागे खेचून धरता येईल तितकी ठेवा. श्वसन नेहमीसारखे असू द्या.
४. सुमारे ३० सेकंद या स्थितीत राहा. या आसनात तोल सांभाळणे कठीण असते.
५. श्वास घ्या. पाय ताठ करा. (चित्र क्र. १२). हात खाली आणा. पुन्हा ताडासनात या (चित्र क्र. १) आणि विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे खांद्यामधील ताठरपणा नाहीसा होतो आणि पायामधल्या बारीकसारीक विकृती ठीक होतात. घोटे मजबूत बनतात आणि पायाचे स्नायू समतोलपणे विकसित होतात. छाती व पोट यांमधील पडदा वर उचलला जातो आणि हृदय सौम्यपणे दाबले जाते. पोटाचे अवयव आणि पाठ यांना दृढता येते आणि छाती पूर्णपणे फुगवली गेल्यामुळे विकसित होते. अश्वारोहकांना हे आसन लाभदायक आहे.
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2020
TOP