एकपाद बकासन १ **
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ४४६ आणि ४४७)
एकपाद म्हणजे एक पाय किंवा पाऊल. बक म्हणजे बगळा.
पध्दती
१. सालंब शीर्षासन २ (चित्र क्र. १९२) करा.
२. श्वास सोडा. दोन्ही पाय जमिनीशी समांतर होईपर्यंत खाली आणा. (चित्र क्र. ४३४) उजवा गुडघा वाकवा. उजवी नडगी उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर बगलेच्या जास्तीत जास्त जवळ ठेवा. डावा पाय हवेमध्ये जमिनीशी समांतर ठेवा. (चित्र क्र.४४५). ही स्थिती पक्की करुन समतोल श्वसन करीत शरीर तोलून धरा.
३. श्वास सोडा. धड वर उचला. डोके जमिनीवरुन उचला आणि मान पुढे ताणा. शरीर जमिनीशी समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. शरीराचा कोणताही भाग डाव्या कोपरावर टेकू देऊ नका. (चित्र क्र. ४४६ व ४४७)/
४. पाठीचा कणा पूर्णपणे ताणून आणि ताणलेला डावा पाय पूर्णपणे लांबवून त्या स्थितीत १० ते २० सेकंद राहा. श्वसन नेहमीसारखे ठेवण्याचा प्रयत्न करा. तोल सांभाळून करण्याचे हे एक कठीण आसन आहे.
५. उजवा पाय वाकवा आणि डोके जमिनीवर टेका. श्वास सोडा आणि सालंब शीर्षासन २ मध्ये या.
६. आता उजवा पाय जमिनीशी समांतर व हवेमध्ये ताठ ताणलेला ठेवून हे आसन डाव्या बाजूने आधीइतकाच वेळ करा.
७. पुन्हा सालंब शीर्षासन २ मध्ये या. पाय जमिनीवर आणा आणि विसावा घ्या. प्रगत अभ्यासकांनी ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र.४८६) करुन ताडासनात (चित्र क्र.१) उभे राहाण्यास हरकत नाही. विपरीत चक्रासन (चित्र क्र. ४८८ ते ४९९) चांगले येऊ लागले म्हणजे ऊर्ध्व धनुरासनानंतर हा व्यायाम अतिशय आल्हादकारक ठरतो.
परिणाम
या आसनामध्ये पोटातील अवयव एका बाजूला आकुंचन पावतात व दुसर्या बाजूला ताणले जातात. या आसनात तोल सांभाळताना पोटातील स्नायू आणि अवयव यांना हातांच्यापेक्षा अधिक व्यायाम मिळतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP