सालंब सर्वांगासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २३५).
हे आसन पहिल्या आसनापेक्षा किंचित अधिक कठीण आहे.
पध्दती
१. सालंब सर्वांगासन करा. (चित्र क्र. २२३).
२. धडाच्या पाठीमागचे हात काढा. बोटे एकमेकात गुंफा. मनगटे वळवा. आणि हात लांबवा. त्यामुळे आंगठे जमिनीला टेकतील व तळहात बाहेर वळतील. (चित्र क्र. २३५) डोके काटकोनात उभ्या राहिलेल्या शरीराच्या एका बाजूला असेल आणि हात दुसर्या बाजूला असतील.
३. पाय आणि पाठ जास्तीत जास्त स्थिर ठेवा.
४. सर्वांगासन १ केल्यानंतर हे आसन १ मिनिटभर करता येईल.
परिणाम
पाठीचे स्नायू ताणून या आसनात तोल सांभाळला जातो आणि मानेच्या मागच्या बाजूवर शरीराचा भार पडतो. त्यामुळे पाठ आणि मान सुदृढ बनतात. दंडांच्या स्नायूंनासुध्दा शक्ती येते.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP