मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
दुर्वासासान **

दुर्वासासान **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३८३)
दुर्वास हे एका अतिशय संतापी ऋषींचे नाव. यांचा रागीटपणा प्रसिध्द आहे.

पध्दती
१. चकोरासनानंतर (चित्र क्र. ३७९) लांबवलेला उजवा पाय जमिनीवर ठेवा. उजवा गुडघा वाकवा आणि दोन्ही तळहात जमिनीवर टेकून कुल्ले उचला व पावलांवर बसा. (चित्र क्र. ३८१).
२. नंतर दोन्ही तळहात उजव्या मांडीवर ठेवा. श्वास सोडा आणि तळहात उजव्या मांडीवर दाबून धड वर उचला. हळू हळू उजव्या पायावर उभे राहा. स्नायू घट्ट आवळून उजवा पाय ताठ उभा ठेवा. (चित्र क्र. ३८२).
३. कंबर आणि छाती वरच्या दिशेला खेचा. छातीसमोर तळहात जुळवा आणि शरीर उजव्या पायावर तोलून धरा. (चित्र क्र. ३८३). डावा पाय मानेच्या मागच्या बाजूवर ठेवलेला असेल. नेहमीप्रमाणे श्वसन करण्याचा प्रयत्न करा.
४. या स्थितीत शक्य तितका वेळ राहा. तोल सांभाळून धरणे कठीण असल्यामुळे सुरवातीला भिंतीचा किंवा एखाद्या मित्राचा आधार घ्या.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP