मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
अर्धमत्स्येंद्रासन २ *

अर्धमत्स्येंद्रासन २ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३३० आणि ३३१)
हे आसन म्हणजे अर्ध मत्स्येंद्रासन १ (चित्र क्र. ३११) चा एक वेगळा प्रकार आहे. पाठीच्या कण्याला या आसनात अधिक प्रमाणात मुरड घातली जाते.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. उजवा गुडघा वाकवा आणि उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा. टाच बेंबीवर दाबून धरा.
३. श्वास सोडा. धड ९० अंशांनी डावीकडे वळवा. डावा हात खांद्यापासून वाकवून पाठीच्या मागे न्या. डावे कोपर वाकवा आणि डाव्या पंजाने उजवा घोटा किंवा नडगी पकडा.
४. डावा पाय या सर्व आसनात समोर ताठ पसरलेला राहावा. डाव्या पावलाचा चवडा किंवा डाव्या पायाचा आंगठा उजव्या हाताने धरुन ठेवावा आणि उजवा हात ताठ ठेवावा. सुरवाती सुरवातीला सर्व आसन चालू असताना डावा पाय जमिनीवर सरळ व ताठ ठेवणे कठीण जाते. तसे झाल्यास डावा गुडघा वाकवा. उजव्या हाताने डाव्या पायाचा आंगठा पकडा आणि मज उजवा हात व डावा पाय हे दोन्ही सरळ करा. मान उजवीकडे वळवा आणि उजव्या खांद्यावरुन नजर पलीकडे लावा. (चित्र क्र. ३३० व ३३१)
५. गुडघे एकमेकाच्या जवळ ठेवा आणि नेहमीप्रमाणे श्वसन करण्याचा पयत्न करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा. एका बाजूला धड वळवल्यामुळे प्रारंभी श्वास जलद होऊ लागेल.
६. पायावरील पकड सोडा. पाय सरळ करा आणि हे आसन दुसर्‍या बाजूने करा. वरील सूचना अमलात आणताना ‘उजवा’ ऐवजी’ ‘डावा’ आणि ‘डावा’ ऐवजी ‘उजवा’ अशी शब्दांची उलटापालट करा.
७. दोन्ही बाजूंकडील आसनात समान वेळ राहा आणि विसावा घ्या.

परिणाम
पोटातील अवयव एका बाजूला आकुंचित होऊन दुसर्‍या बाजूला ताणले जातात व त्यामुळे सुदृढ बनतात. पाठीच्या कण्याला दोन्ही बाजूंना मुरड पडत असल्यामुळे पाठदुखी, लंबँगो आणि कंबरेतील सांधेदुखी ही त्वरेने नाहीशी होताता. मानेचे स्नायू अधिक सशक्त बनतात आणि खांद्यांची हालचाल सहजपणे होऊ लागते. प्रोस्टेट ग्रंथी आणि मूत्राशय यांच्या अतिवृध्दीला, हे आसन नियमितपणे करण्यामुळे प्रतिबंध होतो. परिपूर्ण मत्स्येंद्रासनामध्ये (चित्र क्र. ३६६ आणि ३३९) पाठीच्या कण्याला दोन्ही बाजूंना जास्तीत जास्त मुरड दिली जाते. ते आसन या आसनामुळे सोपे बनते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP