निरालंब सर्वांगासन १ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २३६)
‘आलंब’ म्हणजे आधार किंवा टेकू आणि ‘नि:’ म्हणजे नाही. तेव्हा निरालंब म्हणजे, आधार किंवा टेकू नसलेले. सर्वांगसनाचा हा प्रकार आधीच्या दोन प्रकारापेक्षा अधिक कठिण आहे, कारण या आसनात शरीराला हातांचा आधार नसतो आणि शरीराचा भार व तोल या दोनही गोष्टी मान, पाठ आणि पोट यांच्या स्नायूंना सांभाळाव्या लागतात. व त्यामुळे हे स्नायू सुदृढ बनतात.
पध्दती
१. सालंब सर्वांगासन १ करा. (चित्र क्र. २२३)
२. हात सोडा. ते डोक्यावरुन मागे आणा. काटकोनात उभ्या असलेल्या शरीराच्या ज्या बाजूला डोके असेल त्या बाजूला हात जमिनीवर टेका आणि शरीर तोलून धरा. (चित्र क्र. २३६)
३. या आसनातही एक मिनिट राहाता येईल.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP