मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
ऊर्ध्व धनुरासन १ *

ऊर्ध्व धनुरासन १ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४८२)
ऊर्ध्व म्हणजे वर. धनु म्हणजे धनुष्य. या आसनात शरीराची मागच्या बाजूला कमान केली जाते. आणि शरीर तळहात व चवडे यांवर सावरले जात.

पध्दती
(नवशिक्या अभ्यासकांसाठी)
१. जमिनीवर उताणे निजा. (चित्र क्र. २१९)
२. कोपरे वाकवा आणि डोक्याच्यावर आणा. तळहात खांद्याच्या खाली ठेवा. तळहातांमधील अंतर खांद्यांमधील अंतरापेक्षा जास्त असू नये आणि बोटे पायांकडे रोखलेली असू द्या.
३. गुडघे वाकवा आणि वर उचला आणि पावले ढुंगणाला लागतील इतकी जवळ आणा. (चित्र क्र. ४७९)
४. श्वास सोडा. धड वर उचला आणि टाळू जमिनीवर टेका (चित्र क्र.४८०).
दोनदा श्वास घ्या.
५. आता श्वास सोडा. धड व डोके उचला आणि शरीराचा भार तळहात व चवडे यांवर येईल अशा रीतीने पाठीचे कमान करा (चित्र क्र. ४८१).
६. खांद्यापासूनचे हात, कोपरे सरळ ताठ होईपर्यंत ताणा. आणि त्याचवेळी मांडीचे स्नायू वर खेचून धरा (चित्र क्र. ४८२).
७. शरीराला चांगला ताण बसावा यासाठी श्वास सोडा. टाचा जमिनीवरुन उचलून मांडीचे स्नायू आणखी वर ओढा. छाती फुगवा. पाठीच्या कण्याचा तळचा भाग इतका ताणून धरा की पोट एखाद्या ढोलाप्रमाणे ताठ होईल. त्यानंतर पाठीच्या कण्याचा तळचा भाग इतका ताणून धरा की पोट एखाद्या ढोलाप्रमाणे ताठ होईल. त्यानंतर पाठीच्या कण्याचा ताण कायम ठेवून टाचा जमिनीवर आणा.
८. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या आसनात अर्धे ते एक मिनिट राहा.
९. श्वास सोडून व गुडघे आणि कोपरे वाकवून शरीर जमिनीवर आणा.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP