मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पादांगुष्ठासन *

पादांगुष्ठासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४४)
पाद म्हणजे पाय आणि आंगुष्ठ म्हणजे आंगठा. उभे राहून आणि आंगठे धरुन करावयाचे हे आसन आहे.

पध्दती
१. ताडासनात उभे राहा (चित्र क्र. १). पायांमध्ये एक फूट अंतर ठेवा.
२. श्वास सोडा. पुढे वाका आणि आंगठा व पहिली दोन बोटे यांनी पायांचे आंगठे धरा. यामुळे तळहात एकमेकांसमोर राहतील. आंगठे घट्ट पकडून धरा (चित्र क्र. ४३)
३. डोके वर उचलून धरा. पोट व छाती यांमधील पडदा छातीकडे ताणा आणि पाठ जास्तीत जास्त अंतर्गोल असू द्या. खांद्यापासून वाकण्याऐवजी ओटीपोटापासून वाका म्हणजे कण्याच्या गुदास्थीजवळच्या भागापासून पाठीचा अंतर्गोल आकार योग्य तर्‍हेने राहील.
४. पाय ताठ ठेवा आणि गुडघे व आंगठे यांवरील पकड सैल होऊ देऊ नका. खांद्याची पाती ताणून धरा. या स्थितीत एकदा किंवा दोनदा श्वसन करा.
५. आता श्वास सोडा व गुडघे घट्ट आवळून आणि आंगठे जमिनीवरुन न उचलता खेचून डोके गुडघ्यांच्या मध्ये आणा (चित्र क्र. ४४). या स्थितीमध्ये नेहमीसारखे श्वसन करीत सुमारे २० सेकंद राहा.
६. श्वास घ्या. क्र. २ च्या स्थितीवर या (चित्र क्र. ४३). आंगठे सोडा आणि उभे राहा. पुन्हा ताडासनात या (चित्र क्र. १).

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP