मयूरासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३५४) मयूर म्हणजे मोर.
पध्दती
१. गुडघ्यांमध्ये किंचित अंतर ठेवून गुडघे जमिनीवर टेका.
२. पुढे वाका आणि तळहात उलटे करुन जमिनीवर टेका. करंगळ्या एकमेकींशी जुळलेल्या असाव्यात आणि बोटे पावलांकडे रोखलेली असावीत. (चित्र क्र. ३५१)
३. कोपरे वाकवा आणि कोपरापासून पुढले हात एकत्र जुळवा. पोट व छाती यामधील पडदा कोपरावर टेका आणि दंडांच्या मागच्या बाजूवर छाती टेका.
(चित्र क्र. ३५२)
४. आधी एक व नंतर एक असे पाय लांबवा आणि ते एकत्र जुळवलेले आणि ताठ ठेवा. (३५३)
५. श्वास सोडा. शरीराचा भार मनगटे आणि हातांचे पंजे यांवर ठेवा. आणि एकानंतर दुसरा किंवा एकदम, अशा कोणत्याही पध्दतीने पाय जमिनीवरुन उचला आणि त्याच वेळी धड आणि डोके पुढे ताणा. सबंध शरीर जमिनीशी समांतर राहू द्या. पाय सरळ व ताठ असू द्या आणि पावले जुळवलेली राहू द्या. (चित्र क्र. ३५४)
६. तुम्हाला शक्य होईल तितका काळ या स्थितीत राहा. हा काळ हळूहळू वाढवीत ३० ते ६० सेकंदांपर्यंत न्या. बरगडयांवर दाब येऊ देऊ नका. छाती व पोट यांमधील पडद्यावर दाब येत असल्यामुळे श्वसनामध्ये कष्ट जाणवतील.
७. डोके आणि नंतर पाय जमिनीवर आणा. हातांच्या शेजारी गुडघे जमिनीवर टेका. नंतर हाल उचला आणि विसावा घ्या.
८. हे आसन चांगले येऊ लागल्यावर पाय सरळ व ताठ ताणलेले ठेवण्याऐवजी पद्मासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. १०४) पायांची मांडी घालण्यास शिका. या प्रकाराचे नाव आहे :
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP