निरालंब सर्वांगासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २३७)
सर्वांगसनाच्या सर्व प्रकारांमध्ये हा प्रकार जास्ती कठीण आहे. सर्वांगसनाच्या इतर प्रकारांपेक्षा या प्रकारामध्ये, पाठीचे मणके अधिक ताणता येतात आणि त्यामुळे सालंब सर्वांगासन (चित्र क्र. २२३) उत्तम रीतीने करण्यास या आसनाचे सहाय्य होते.
पध्दती
१. आधीचे आसन करुन हात उचला आणि तळहात गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांच्या बाजूस ठेवा. (चित्र क्र. २३७) पाय मात्र तळहातांवर टेकू नका.
२. या स्थितीमध्ये एक मिनिट राहा. त्यानंतर काही वेळ सालंब सर्वांगासन १ मध्ये जा. नंतर खाली येऊन हलासन करा. (चित्र क्र. २४४) आणि सर्वांगासनाचे इतर प्रकार त्यानंतर एकामागून एक करा.
परिणाम
सर्वांगासनाचे हे विविध प्रकार केल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. आणि विषद्रव्ये निर्माण करणारा मळ निघून जातो. त्यानंतर संपूर्ण शरीर सुधारते. ही आसने शक्तिवर्धकांसारखी आहेत. आजारानंतरची अशक्तत लवकर जाण्यासाठी ही आसने करावीत.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP