एकहस्तभुजासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३४४)
एकहस्त म्हणजे एक हात आणि भुज म्हणजे दंड.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ३४४)
२. श्वास सोडा. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा. तो उजव्या हाताने घोटयाशी पकडा आणि उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर आणून ठेवा. आता उजव्या मांडीची मागची बाजू उजव्या दंडाच्या मागच्या बाजूला स्पर्श करील. मांडी शक्य तितकी उंचावर ठेवा.
३. तळहात जमिनीवर टेका आणि श्वास सोडून सबंध शरीर जमिनीवरुन उचलून तोल सावरुन धरा. (चित्र क्र. ३४४).
४. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत २० ते ४० सेकंद राहा.
५. तोल सांभाळीत असताना डावा पाय सर्व वेळ ताठ आणि जमिनीशी समांतर असू द्या.
६. श्वास सोडा. धड जमिनीवर आणा. उजवा पाय मोकळा करा. तो सरळ जमिनीवर पसरा आणि हे आसन दुसर्या बाजूने आधीच्याच इतका वेळ करा.
परिणाम
या आसनामुळे दंड मजबूत बनतात व पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP