मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
लोलासन *

लोलासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ८३)
लोल म्हणजे कंपित होणारे, पुढेमागे हालणारे किंवा कर्णभूषणांप्रमाणे लटकत राहाणारे. या आसनामध्ये पाय व पावले गोमुखासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. ८०) ठेवली जातात. हात पुठ्ठ्याशेजारी जमिनीवर ठेवले जातात. शरीर उचलले जाते आणि त्याचा भार केवळ तळहात आणि मनगटे यांवर टाकला जातो. नंतर शरीराला पुढे व मागे किंचित झोका देत तोल सांभाळला जातो. ही कृती एखाद्या झुलत्या पदकाप्रमाणे दिसते.

पध्दती
१. पाय सरळ पुढे पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. पुठ्ठ्याशेजारी तळहात जमिनीवर टेकवा.
३. ढुंगण उचला. उजवा गुढगा वाकवून मागे घ्या. उजवा चवडा डाव्या कुल्ल्याखाली ठेवा आणि त्याच्यावर बसा.
४. डावा गुढगा वाकवून मागे घ्या. आणि ढुंगण उचलून डावा चवडा उजव्या कुल्ल्याखाली ठेवून त्यावर बसा.
५. उजवी नडगी डाव्या पोटरीवर येईल अशा तर्‍हेने मांडी घातली जाईल. पायाची बोटे मागे रोखलेली असू द्या. (चित्र क्र. ८२)
६. काही वेळा श्वसन करा. श्वास सोडा. धड आणि पांय जमिनीवरुन उचला. हात ताठ करुन हातावर तोल सांभाळा. (चित्र क्र. ८३) धड आणि पाय यांना संथपणे पुढे व मागे झोका द्या. श्वसन नेहमीप्रमाणे चालू ठेवा.
७. जमिनीवर टेकून विसावा घ्या. आणि मांडी मोडा.
८. उलटया बाजूने मांडी घाला आणि पुन्हा हातावर तोल सांभाळा.
९. शक्य होईल तितका वेळ हातावर शरीर तोलून रहा.

परिणाम
या आसनामुळे मनगटे आणि हात सशक्त बनतात. त्याचप्रमाणे पाठीचे स्नायू व पोटातील अवयव यांना शक्ती लाभते. पायाचे स्नायू त्यामुळे लवचिक बनतात आणि हातामधील दुय्यम विकसित होऊन सुधारतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP