मरीच्यासन २ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३०५)
या प्रकारामध्ये मरीच्यासन २ (चित्र क्र. १४६) मरीच्यासन ३ (चित्र क्र. ३०३) यांमधील कृती एकत्र केल्या आहेत.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा. उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मूळाशी ठेवा. उजवी टाच बेंबीवर दाबलेली राहून बोटे ताठ असावी. उजवा पाय आता अर्धपद्मासनात असेल.
३. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डाव्या पायाचा चवडा आणि टाच सरळ जमिनीवर टेका. नडगी जमिनीशी काटकोनात असू द्या. त्यामुळे डावी मांडी आणि पोटरी एकमेकांना स्पर्श करतील व डावी टाच शिवणीला स्पर्श करील.
४. श्वास सोडा. पाठीचा कणा ९० अंशांनी डावीकडे वळवा. त्यामुळे उजवी बगल डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करील.
५. उजवा खांदा डाव्या गुडघ्याच्या पलीकडे टेका. आणि खुब्याचा भाग ताणून व पाठीचा कणा आणखी डावीकडे वळवून उजवा हात पुढच्या दिशेला ताणा. एकदा श्वास घ्या.
६. श्वास सोडा. उजवा हात डाव्या गुडघ्याभोवती लपेटा. उजवे कोपर वाकवा. उजवा पंजा कंबरेच्या पाठीमागे ठेवा. आता डावा गुडघा उजव्या बगलेमध्ये घट्ट अडकविलेला राहील. एकदा श्वास घ्या.
७. आता दीर्घ श्वास सोडून खांद्यापासूनचा डावा हात पाठीच्या मागे न्या. आणि उजव्या पंज्याने पाठीच्या मागे डावा हात पकडा. छाती ताणा आणि पाठीचा कणा वर खेचा. (चित्र क्र. ३०५ आणि ३०६)
८. या स्थितीत ३० सेकंद राहा. यावेळी श्वसन नेहमीपेक्षा अधिक वेगाने होत राहील.
९. हात मोकळे करा आणि पाय ताठ करा.
१०. हे आसन दुसर्या बाजूने पुन्ह करा; वरील सूचनांमध्ये ‘उजवा’ ऐवजी ‘डावा’ आणि ‘डावा’ ऐवजी ‘उजवा’ असा बदल करा. पाय ताठ करा आणि विसावा घ्या.
परिणाम
बेंबीवर येणारा टाचेचा दाब आणि पाठीच्या मागे दोन हात एकत्र येणे यांच्यामुळे बेंबीभोवतीच्या मज्जातंतूंना नवे जीवन लाभते. यकृत, प्लीहा आणि स्वादुपिंड सुधारतात. खांद्याच्या जोडसांध्यामध्ये जमा झालेला कँल्शियम विखुरला जातो आणि या आसनामुळे खांद्याच्या हालचाली अधिक मोकळेपणाने होऊ लागतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP