मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
प्रसारित पादोत्तानासन २ *

प्रसारित पादोत्तानासन २ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३५ आणि ३६)
आधीच्या आसनाचा हा पुढला टप्पा आहे. या आसनात तळहात जमिनीऐवजी कंबरेवर ठेवले जातात. (चित्र क्र. ३५) किंवा पार्श्वोत्तानासनात (चित्र क्र. २६) सांगितल्याप्रमाणे पाठीमागे नमस्काराप्रमाणे जुळवलेले असतात. (चित्र क्र. ३६) या कृतीमुळे पायांचा ताण अधिक वाढतो.

परिणाम
या आसनामुळे गुडघ्यामागील शिरा आणि अवयव वर उचलणारे स्नायू (obductor muscles) पूर्णपणे विकसित होतात. त्याच वेळी धड आणि डोके यांच्याकडे रक्तप्रवाह वाहू लागतो. ज्या लोकांना शीर्षासन (चित्र क्र. १८४) करणे शक्य नसते, त्यांना या आसनापासून फायदा होईल. या आसनाने पचनशक्ती वाढते. वर वर्णन केलेली, उभे राहून करण्याची आसने नवशिक्यांसाठी आवश्यक आहेत. अभ्यासकाची पुढे प्रगती होऊ लागली म्हणजे त्याच्या अंगी अधिक लवचिकपणा येऊ लागतो आणि मग उभे राहून करण्याची आसने केली नाहीत तरी चालते. तरीही ही आसने आठवडयातून एकदा करणे हिताचे असते. उभे राहून करण्याच्या सर्व आसनांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP