प्रस्तावना.
ऐतिहासिक घराण्यांच्या या वंशावळी तयार करण्याचं काम माझ्या ह्यातींत पुरे
होत असलेलें पाहून मजप्रमाणेंच इतिहासाभ्यासकांसही संतोष वाटेल. काम कांहीं मोठे
अवघड नव्हे, पण प्रचंड साधनसाहित्यांतील जरूर तो अंश वेचून एकत्र आणणें अत्यंत
श्रमाचें व कालव्ययाचें. एकटयादुकटयाचे हातून तडीस जाण्याजोगें नाहीं. इतिहास
नानाविध व्यक्तींच्या परात्रमानें बनतो, अर्थात त्या व्यक्ति कोणत्या घराण्यांतल्या,
कशा पुढें आल्या, त्यांचे जन्ममृत्यु केव्हां कसे झाले, त्यांची समकालीन परिस्थिति कशा
प्रकारची होती, हे तपशील जितक्या विपुलतेनें उपलब्ध होतील तितका तो इतिहास
भरीव व मार्गदर्शी बनेल. व्यक्तींचीं कुटुंबं बनतात आणि कुटुंबांनीं समाज घ
राष्ट्र बनत जाते. यास्तव व्यक्तींचा व कुटुंबांचा भरपूर तपशील वाचकांपुढें येण्यास
वंशावळी हें एकमेव महत्त्वाचें साधन सदैव हाताशी सिद्ध पाहिजे, तरच तो इतिहास
उपयोगाचा होईल. अर्थात मी रियासतींचे काम स्वीकारलें तेव्हांपासून हा वेळपर्यंत
प्रमुख व्यक्तींच्या वंशावळी जिथें जशा साधल्या किवा पैदा झाल्या तशा त्या मी त्या
त्या वेळीं पुस्तकांत दाखल करीत गेलों. या वंशावळी पुष्कळशा अपुऱ्या, थोडघा
बहुत सदोष होत्या हैं मी जाणून होतों आणि हे दोष काढून टाकण्याचा प्रयत्नही मी
सारखा चालू ठेविला होता. पत्रें लिहून तपास करून माहिती मिळविणें आणि ती
पुस्तकांत दाखल करणे हा माझा मुख्य व्यवसाय बनला आणि तशा स्वरूपाचा लेख
संग्रह मी जपून ठेवला आहे. रियासतींचे भाग प्रसिद्ध होत गेले, त्यांचीं परीक्षणें
निदर्शनास आलीं, अनेक वाचकांनीं न मागता माहिती पुरविली, ती सर्व एकत्र करून
वाचकांस सादर करावी हा मनोदय मनांत सारखा वागत होता.
स. १९३२ सालीं रियासतीचें पहिलें कच्चें काम पूर्ण झालें, त्याच संधीस पेशवे
दप्तरची तपासणी चालन पुष्कळशी नवीन माहिती हातीं आली, तेव्हां रियासतीचें
सर्व भाग दूरुस्त करण्याचे काम आरंभिलें, त्यांत मोठी अडचण या वंशावळीची उत्पन्न
झाली. जेव्हां जशा मिळाल्या तशा मी त्या प्रसिद्ध करीत गेल्यामुळे, कोणत्या घरा-
ण्याची वंशावळ कोणत्या भागांत आली हें माझे मलाच समजेना, मग वाचकांना तो
प्रकार किती जाचत असेल हें माझे लक्षांत आलें आणि वंशावळीचा एक स्वतंत्र भागच
अलग काढावा असा विचार ठरविला. रियासतींबरोबरच मी वंशावळीही दुरुस्ती
करीत गेलों, तरी हें सर्वच काम रेंगाळत चाललें आणि कोणी तरी सहाय्यक असल्या-
शिवाय एकटयाच्या हातून तें पूर्ण होईल अशी खात्री वाटेना. कर्मधर्मसंयोगाने वि. सि.
चितळे हे एक कष्टाळ सहाय्यक, मला लाभले. तेव्हां स. १९४६ च्या ता. ११ जुलईस
मी एक जाहीर विनंती प्रसिद्ध करून विद्यमान वंशजांकड़न माहिती विचारली. तद-
नुसार कांहीं उत्तर आलीं ती जमेस धरून रा. चितळे यांनी पुष्कळशा वंशावळी पुनः