१७१
वाकेनवीस ऊर्फ मंत्री.
हैं प्रधानपद अनेक घराण्यांकडे-चाललें.
(१) गंगू मंगाजी ( स . १६४७) | भिडे-शि. म अ. इ. ]
(२) दत्ताजी त्रिमल ( १६६४-१६७४) यास शाहूनें स. १७०७त राजाज्ञा
पद दिलें. पुढें स. १७१३त नारोराम मंत्रीपदावर आला. त्या घराण्याकडे पद चाललें.
वामोरीकर, नागोराम भागवत, कों० ब्रा०, नानासाहेब पेशव्यांचा सरदार, बळवंत
राव मेहेंदळ्याचे हाताखालीं कर्नाटकच्या व निजामाकडील कामगिरीवर, उद्गीरच्या
तहानें मिळालेला प्रदेश ताव्यांत घेणारा. याची पत्रें पे द. २५ यांत पहावीं.
यसि स. १७५६ त सावनूरचे संग्रामांत जखम लागली.
नागनाथ सवाईमाधवरावाचे तैनातीस होता. त्यानें पेशव्यांचे संधान बाजीराव
रघुनाथाकडे जमविलें म्हणून प्रकरण विकोपास गेलें.
दूसर्या बाजीरावाचा सासरा धोडभट भागवत याच घराण्याचा असंल काय ?
याचा पुत्र बळवंतराव
(म. इ. सा. खं. १०-४१५)
साठे, शिवभट, कों० ब्रा० गोत्र वाशिष्ठ, घराण्याचा पत्ता मिळत नाहीं. साठे
कु. वृ० प्रसिद्ध झाला आहे. कायगावकर दीक्षित पाटणकर यांचे सावकारीत
वागणारा हा गृहस्थ नागपुरचे राज्य संवर्धनांत प्रमुख होता. शिवभट व त्याचा
भाऊ भास्करभट दोघे कारभारांत वावरत होते. स. १७६८ पवेतों नागपुरकर
भोसल्यांचे तर्फेने शिवभटानें ओरिसाचा कारभार केला, त्यांत त्यानें इंग्रजांशीं चौथाई
संबंधानें ताठर धोरण चालविलें म्हणून तो त्यांस अप्रिय झाला. त्याचे पश्चात गणेश
संभाजी ओरिसाचे कारभारावर आला.
स. १७५२ पासून याचे लेख आहेत.
(१) काळे ना.इ०भा. ११ (२) त्रे. व. ५ पृ. ५९-११८:
(३) ऐ.सं. सा. ३ले. २७७ : (४) म. इ. सा खं. ३च्या शेवटीं पत्रें.
(५) पशियन कॅलेन्डरच्या आरंभीच्या भागांत भरपूर पत्रव्यवहार.
व्यास, धुंडिराज लक्ष्मण, दे०ब्रा० पंडित, 'राजव्यवहार कोशकर्ता (शि०च०प्र०)
व्यासान्वयाब्धि चन्द्रेण लक्ष्मण व्यासुसूनना कोशोयं धुंडिराजेन रघुनाथ मुदेकृतः
लेखन काल स. १७१३.
याच पंडिताने मुद्राराक्षस व्याख्या व मुद्राराक्षस कथोपधात
हीं प्रकरणें आणखी लिहिलीं.
१ राजव्यवहा र कोशाचें काम शिवाजी महाराजानीं अमात्य रघुनाथ पंत हणमंते
यांजवर सोंपविलें होतें. पण दक्षिण विजयाच्या धामधुरमीत हणमंते गुंतला असल्यामुळें
त्याने तें काम आपला हुस्तक धुंढीराज लक्ष्मण व्यास यांजकडे सोंपविलें.