१९१
मोधे, चिमणाजी दामोदर, रिंगणगांवकर प्रतिष्ठित मराठा सरदार कन्हाडा अा०
कृष्णाजी मोघे
(इ. वृ. श. १८३७ ले. १७९ पृ. ३२२)
दामोदर
शिवाजी (मू. १७३९ नंतर)
খिमणाजी (मू. १७३३ चे
अंदाजात)
बळवंतराव (मू. १७५२)
त्रिवकराव (पानपतावर काम केलें
मं. १८१८ चे अंदाजांत)
हरिपंत
माघवराव
बळवंत
रामभाऊ
ताराबाईचे तर्फेनें खानदेशांत असतांना परसोजी भोसल्याबरोबर शाहूस सामील झाला.
पुढील वर्षी शाहूनें त्यास राजाज्ञा पद दिलें, तेव्हांपासून कांहीं वर्षे तो शाहूचे पक्षांत
राहिला. (शा. रो. ४, ६, २३-२८) पुढें तो कोल्हापुरचे संभाजीस मिळाल्यानें शाहचे
इतराजींत आला.
स. १७२८ त संभाजीनें त्यास आपलें पेशवेपद दिलें. पूढे वारणेच्या
तहानें तो परत शाह व बाजीराव याजबरोबर कामास लागला. पश्चात् त्याचे वंशज
पेशव्यांचे आज्ञेंत वागले.