१७०
रघुनाथ यादेव, पानिपत बखरकार, चां. का. प्र. चिटणिसाचे पदरचा लेखक, चित्र-
गुप्त बखरीचा कर्ता. संभाजी छत्रपतिपासून पानिपतपर्यंत उलाढाली पाहिलेला
पुरुष. पानिपताहून आल्यावर गोपिकाबाईच्या आग्रहावरून त्या प्रसंगाची हकीकत
लिहिली, तिची तारीख १८ फेब्रुवारी स.१७६३ आहे. पुरुषांत सुंदर विश्वासराव
व स्त्रियांत सुंदर मस्तानी असें याचें विधान आहे. याचे वंशाचा पत्ता लागला नाही.
रणदुल्लाखान, विजापुरचा सेनानी, शहाजीचा पुरस्कर्ता वा० रहिमतपुर, सुभेदार
प्रांत वाई. याची कबर रहिमतपुरांत आहे. त्याच्या दग्यास विजापुरांतून इनाम
होतें तें छत्रपतींनीं चालू ठेविलें. मुजावरांची वंशावळ त्रै. व ७.९पृ. ३२ येथें आहे.
रामदासपंत ऊ० राजारधुनाथदास, (खून ७ एप्रिल स. १७५२.) हा
शिकाकोलचा ब्राह्मण मुत्सद्दी डुप्ले फ्रेंच गव्हर्नराचे विश्वासांतला, नेमणूक निजाम-
शाहींत नासिरजंगाचे पदरीं पश्चात मुजफ्फरजंगाचा कारभारी. बुसीचा आश्रय
संपादून त्याने साताऱ्यास ताराबाईकडे राजकारणें चालविलीं.
रामदीन, होळकरांचा सरदार, महत्पुरच्या लढाईत पराकाष्ठा केल्यावर आपलें
कोटावर
पथक घेऊन धावत बाजीराव पेशव्याचे साहयास धावला आणि
धूळ
बाजौरावाबरोबरच इंग्रजांस शरण गेला.
(पे. अ. बखर वगैरे) .
राहतेकर, अन्याबा मूळनांव परशुराम खंडेराव, दुसऱ्या बाजीरावाचा सेवक, ऋ०
दे० ब्रा० : ऐतिहासिक कामगिरी विशेष नसतां बाजीरावाची मर्जी सांभाळून
वागणाच्या मंडळीपैकीं. याची बायको उमाबाई हिचा अर्ज निर्वाह वेतन मागणीचा
ता. ४ ऑक्टोबर स. १८४३चा उपलब्ध आहे. (पे. द. ४४-१).
रोझेकर, शामराज नीलकंठ, (औरंगाबादजवळ) शिवाजीचा पहिला पेशवा
शहाजीकडून शिवाजीकडे आलेला, स. १६४५ चे आंत बाहेर राज्य उभारणी.
१६६२ पर्यंत याचे शिक्के मिळतात. सबब त्या सालीं मोरोपंत पिंगळ्यांची नेमणूक
पेशवाईवर झाली असावी.
असा आहे.
सन
शामराज नीलकंठाचा शिक्का महादेव मतिमंतप्रधान
(म. इ. सा. खं. १५ ले २७४,२७५,३३९, ४४० वगैरे.)