१६५
अनाजी रंगनाथ मलकरे, शिवाजीच्या ९१ कलमी बखरीचा लेखक द०ब्रा०रा०
नागरगांव (ऊ० तुळापुर) याचा वंशज महादेव भट बिन शिवभट लोहकरे (शि. च.
सा. २ले. ३९६). अनाजीचा बाप रंगनाथ भट ग्राम ज्योतिषी याचा उल्लेख स.प.
ले १३च्या दानपत्रांत सांपडतो (पृ१८).
अमृतराव शंकर, पेशवाईतील एक अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ति, गोविंद
शिवराम खासगीवाले याचा भाचा (भगिनी पुत्र ), को०.ब्रा०, उपनांव निर्देश उपलब्ध
नाहीं. हा बळंवतराव मेहेंदळ्यांचे कर्नाटकस्वारींत असता' तिरुपतूरच्या लढाईत
ता.८ फेब्रु०स.१७५८ रोजीं मारला गेला. पेशव्यांसुद्धां सर्वांस अत्यंत हळहळ वाटली.
थोरल्या बाजीरावापासून अनेक राजकारणांत याची कर्तबगारी प्रगट झाली. बंगाल-
पासून कर्नाटकपर्यंतच्या विस्तृत प्रदेशांत याने नानाविध कामें वकिलीची व युद्धांचीं
संपादून लौकिक मिळविला. हा फारसी भाषेंत निष्णात असून चार वर्षे मुशिदाबादेस
राहिला.
आनंदराव काशी, पुण्याचा कोतवाल, ऋ० दे० ब्रा० गोत्र भारद्वाज उपनांव वाचा-
सुंदर, पालीचे जोशी.
(१) इ. वृ. श. १८३७ प० १४१.
१९१३ पृ ४९-५१ (३) ऐं. स्फु. ले. ३.१५ (४) समस्त कोतवालांची यादी पू.
सं. वृ. खं ४ प. ३ पहा.
(२) इ. सं. अंक. १०-१२ में जुलै
आनंदराव काशी नेमणूक कोतवालीवर १६ जुलई १७७६ व पुनः ता. ३१ आगस्ट
स. १७९१ रोजीं घाशीराम मारला गेल्यावर हा पुनः कोतवाल झाला.
कवि कलश ऊर्फ कलुशा, संभाजींचा प्रधान छंदोगामात्य हा बहुधा शिवाजीच्या
राज्याभिषेकसमयीं किंवा त्यापूर्वी महाराष्ट्रांत आला असावा. याची विद्वत्ता व
लायकी शि. च. सा. ३ले ६४४पू. २३५ या कागदांतील उपपदांवरून लक्षांत येते. तो
विद्वान पंडित संस्कृत विद्या चांगली जाणणारा होता.
प्रवाद खरा दिसत नाहीं. धन्याबरोबरच सर्वस्वाचा त्याग करून तो प्राणांस मुकला.
याच्या वंशाचा थांग लागत नाहीं.
तो औरंगजेबाचा हेर असल्याचा
करमाळेकर बाबाराव गोविंद ऋ० दे० ब्रा० निजामाचा वकील महादजीजवळ
उत्तर हिंदुस्थानांत व पुण्याचे मुक्कामांत. मराठशाहींत याची प्रतिष्ठा असून
अहल्याबाईनें त्याची वाखाणणी केलेली आढळते. हा राजकारणें सांभाळीत असे.
(म. रि. उ. वि. २).