१६६
काळे, आबाजी महादेव, रघुनाथरावदादाचा एकनिष्ठ सेवक. कों० ब्रा० हैदर-
अलीकडे व इतर सत्ताधीशांकडे, दादाचें संधान राखणारा, पानिपतोत्तरपासून साल-
बाईं पावेतों याचा पत्ता लागतो.
खंडो महादेव, होळकराचा वकील नागपूरकर भोसल्यांचे दरबारांत, मुर्यतः
तुळसाबाईंचे व्यवहार पहाणारा.
(हो. शा. इ. सा. प.).
गिजरे धर्माधिकारी, कन्हाडचे, दे०ब्रा० विस्तीर्ण घराणें, याचे पुष्कळ कागद
छापले आहेत, त्यांत बहुधा त्यांची धर्माधिकारवृत्ति आणि सामाजिक व आर्थिक
व्यवहारांची माहिती आहे, राजकीय प्रकरणांत भाग घेणाऱ्या व्यवती फार नाहींत.
(म. इ. सा. खं २१ व खं. २४).
त्रिबक सूर्याजी, प्रभु उपनाम चौबळ चां. का. प्रभु हा एकच पुरुष बारभाईच्या
व तोतयाच्या प्रकरणांत त्रिबकचा किल्लेदार म्हणून रघुनाथराव दादाचा पुरस्कत्ता
होता. उत्तर पेशवाईत याचें नांव येतें.
दिघे, विश्वासराव नानाजी शिवाजीचा चतुर हेर, वाईच्या अफजलखानाच्या
छावणींतून गुप्त बातमी आणणारा (स. १६१५-१६७०)
देशपांडे, बाजी प्रभु, हिरडस मावळचा, देशमुखांचे पदरचा उपनांव प्रधान चां.
की. प्रभु
[ (१) त्रे. व. ४ पृ. ४० %;
(२) म. इ. सा. खं. १५.३६३ ].
आरंभापासून शिवाजीच्या सेवेंत राहून विशाळगडच्या घोडखिंडींत आषाढ
व० १ शके १५८२ ता. १३ जुलई स.१६६० या दिवशीं मोगलांशीं लढण्यांत प्राणास
मुकला. आपले प्राण देऊन त्याने शिवाजीचे प्राण वांचविले.
होते. वडील बाबाजी यास शिवाजीनें बापाची सरदारी दिली.
त्यास पुत्र सात