१४७
शिकें, विस्तृत घराणें सूर्यवंशी क्षत्रिय, छत्रपति घराण्याशीं सोयीरगती. राज-
पुतान्यांतून महाराष्ट्रांत येऊन सहयप्रदेशांत शिरकवली येथें वसती केल्यावरून उपनांव
शिरके मिळालें. कालांतरानें अनेक शाखा निधाल्या, पैकीं कुटरेकर व मळेकर या
प्रमुख (चिपळूणनजीक) होत. जवळच शृन्णारपूर येथें सूर्यराव ऊ. सुरवें हे प्राचीन
क्षत्रिय राज्य करीत होते, त्यांचा कारभार हे शिकें करूं लागले. अफझलखान वधा-
नंतर शिवाजीनें कोंकणांत स्वारी करून सुवें व शिर्के दोधांसही आपलें अंकित बनविलें,
तेव्हांपासून शिर्के स्वराज्याच्या सेवेंत कायम राहिले. गणोजी शि्के मळेकर यानें
२१ नोव्हें. स. १८६२ रोजीं विस्तृत वंशावळ गुदरली तीच आधार मानली पाहिजे.
(१) शि. च. सा. ३ पृ. ५०-५१; (२) म. इ. सा. खं ३ लें., १४५ व १५७}
(३) इ. सं. अंक १० में १९१०. पृ. ३५-४८ प्रा. म. स. शिर्के.
तानाजी राजे शिकं
वाघोजी राजे
तानाजी
सोयराबाई = शिवछत्रपति
.पिलाजी (मळेकर शाखा)
कान्होजी
गणोजी
जिऊबाई ऊ. येसूबाई देवजी
=राजकुवर =मंभाजी छतपति
रामोजी विठोजी
(मृ. २१-६-१७४८)
दौलतराव (शित्राजी कन्या)
कान्होजी (कुटरेकर)
राणूबाई ऊ. सकवारवा.
=शाहू छत्रपति
कुवरजी
बहीरजी (मळेकर)
लक्ष्मणराव
यावरून छत्रपति घराण्याशीं शिर्के मंडळोचा किती आप्तपणा शिवाजीपासून सारखा चालू
राहिला हैं कळून येईल. गणोजी शिक्के शिवाजीचा जांवई. शाहूचे पश्चात्ही अखेर-
पावेतों हा आप्तपणा कायम चालला. रामराजाची बायको राणी दुर्गाबाई ही शिक्यांकडील.
धाकटे शाहूची बायको आनंदीबाई माईसाहेब ही त्याच कुटुंबांतली. हिचे तीन पुत्र
प्रतापसिंह, रामवंद्र व शहाजी हे मराठशाही वी अंतिम मय्यादा दाखवितात. या आनंदीबाई
माईसाहेबांचा भाऊ खंडेराव शि्कें प्रतापासिंहाचा प्रमुख साहघकर्ता होता. प्रतापसिहाची
दुसरी राणी व शहाजो अपासाहेबाची राणी सगुणाबाई या दोघी शिक्यंवे कुटुंबातल्या.
संगुणाबाईनें विहिकोरिया राणीस पाठविलेल्या अपिलात सर्व कोट्ुंबिक खुलासा नमूद आहे.
MO-A Na 127-10a