१२०
मोंगलांचे पूर्वज
चंगीक्षखान
ज. सन ११६३; मृ. सन १२२७; रा. सन १२०६. रा. व. २१%;B व. व ६४.
अर्वाचीन काळांत समस्त आशिया खंडांतील हुण, तुर्क, मोगल इत्यादि
विस्कळित लोकांस पराक्रमाचें व राज्याचें प्रचंड क्षेत्र निर्माण करून देणारा
पहिला मोठा पुरुष चंगीझखान हा होय. चीनपासून स्वतंत्र झालेला सरदार युझुगाईं
याचा मुलगा तेमुजिन यानेंच चंगीझखान म्ह० विक्रमादित्य हें नांव घेतलें. पराक्रमांत
व क्रूर कृत्यांत याची बरोबरी करणारा दुसरा पुरुष झाला नाहीं. याची जात मोगल
व धर्म मूर्तिपूजेचा असून कालांतरानें त्याच्या वंशजांनीं इस्लामाचा स्वीकार केला।
त्याच्या राज्याची हद्द पश्चिमेस युरोपांतील नीपर नदीपासून दक्षिणेस सिंधुनदीस
धरून पूर्वस चिनी समुद्रास भिडली होती. तावडींत सांपडतील तितकै देश
पादाक्रान्त करण्याची जी ऊमि चंगीझखानानें उठविली, तिचाच संचार तयमूरलंग,
बाबर वरगैरे पुरुषांच्या ठिकाणीं अवतरला. यामुळे मध्यआशियाच्या वारुळांतून
बाहेर पडणाच्या शेंकडों झुंडींचा आघात हिंदुस्थानास सहन करावा लागला.
म्हणूनच इतिहासांत चंगीझखान ही व्यक्ति अत्यंत क्रान्तिकारक समजली जाते.
चंगीझखान (११६३-१२२७)
ओक्ताईखान
तुलुईखान
जूजीखान
झगताईखान
कुब्लोईखान
त्रातू
शयबान
मुआतूखान
हुलाकूखान
यिसून्तवाखान
बराकखान
दावाखान
ऐसान-बूगाखान
तुष्लुक-तिमूरखान
खिजर-र्वाजाखान
मुहम्मदखान
शेरअली-औख्तान
*सखान
यूनसंखान
कुल्लघनिगारखानम्
(बावराची आई)