मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जनी बैसली न्हायाला । पाणी...

संत जनाबाई - जनी बैसली न्हायाला । पाणी...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनी बैसली न्हायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥

घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥

घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥

ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP