मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
स्त्री जन्म ह्मणवुनी न व्...

संत जनाबाई - स्त्री जन्म ह्मणवुनी न व्...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥

संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥

विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥

न विचारितां कुळ गणिका उद्धरिली । नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥

ऋषींचीं कुळें उच्चारिलीं जेणें । स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥

नामयाची जनी भक्तितें सादर । माझें तें साचार विटेवरी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP