मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
भक्तीसाठीं याति नाहीं । न...

संत जनाबाई - भक्तीसाठीं याति नाहीं । न...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भक्तीसाठीं याति नाहीं । नाहीं तयासी ते सोई ॥१॥

रोहिदास तो चांभार । त्याचा करी कारभार ॥२॥

जो कां भक्त यातिहीन । देव करी त्याचा मान ॥३॥

त्यासी भक्ताचा आधार । चाट पाहे निरंतर ॥४॥

जनी म्हणे भक्तासाठीं । विठो सदा गोण्या लोटी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP