मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
रुक्माई आईचें आहे ऐसें भा...

संत जनाबाई - रुक्माई आईचें आहे ऐसें भा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥

सख्या पुंडलिका आवडतें स्थळ । असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥

अहो संतजन घ्या आवडतें धन । असावें कल्याण चिरकाळ ॥३॥

जन्मोजन्मीं हेंचि मागें गोविंदासी । म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP