मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
माझें दुःख नाशी देवा । मज...

संत जनाबाई - माझें दुःख नाशी देवा । मज...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


माझें दुःख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥१॥

आह्मां सुख ऐसें देई । तुझी कृपा विठाबाई ॥२॥

चरणीं अनन्य शरण । त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥

जनी म्हणे हेंचि मागें । धण्या सर्व तुज सांगें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP