मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
विष्णुमुद्रेचा अंकिला । त...

संत जनाबाई - विष्णुमुद्रेचा अंकिला । त...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


विष्णुमुद्रेचा अंकिला । तोचि वैष्णव एक भला ॥१॥

अहं जाळोनी अंगारा । सोहंभस्मी तीर्थ सारा ॥२॥

विष्णु माया द्वारावती । भक्तिमुद्रा त्या मिरवती ॥३॥

पंचायतन पूजी भावें । अहं सोहं भस्मीं नांवें ॥४॥

प्रेमतुळसी कानीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP