मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जेवीं जेवीं बा मुरारी । त...

संत जनाबाई - जेवीं जेवीं बा मुरारी । त...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जेवीं जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥

कनकाचे ताटीं । रत्‍नजडित ठेविली वाटी ॥२॥

आमुचें ब्रह्म सारंग पाणी । हिंडतसे रानोरानीं ॥३॥

गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडूफळी ॥४॥

तुळसीचे वनीं । उभी राहे दासी जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP