मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
अळकापुरवासिनी समिप इंद्रा...

संत जनाबाई - अळकापुरवासिनी समिप इंद्रा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ॥१॥

ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं । धांवोनियां येई दूडदुडां ॥२॥

बहु कासाविस होतो माझा जीव । कनवाळ्याची कींव येऊं द्यावी ॥३॥

नामयाची जनी म्हणावी आपुली । पायीं सांभाळिली मायमापें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP