मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
पुंडलिकापाशीं । नामा उभा ...

संत जनाबाई - पुंडलिकापाशीं । नामा उभा ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पुंडलिकापाशीं । नामा उभा कीर्तनासी ॥१॥

येऊनियां पांडुरंगें । स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥

गाऊं लागे बरोबरी । नाहीं बोलायाची उरी ॥३॥

स्वर देवाचा उमटला । दासी जनीनें ओळखिला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP