मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
साळी सडायास काढी । पुढें ...

संत जनाबाई - साळी सडायास काढी । पुढें ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥

कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥

सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥

पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥

हाता आला असे फोड । जनी ह्मणे मुसळ सोड ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP