मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
संतांचा तो संग नव्हे भलतै...

संत जनाबाई - संतांचा तो संग नव्हे भलतै...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


संतांचा तो संग नव्हे भलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥१॥

चंदनाचे संगें पालटती झाडें । दुर्बळ लांकडें देवामायां ॥२॥

हें कां ऐसें व्हावें संगती स्वभावें । आणिकें न पालटावें देहालागीं ॥३॥

तैसा निःसंगाचा संग अग्रगणी । जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP