मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जनींचें बोलणें वाची नित्य...

संत जनाबाई - जनींचें बोलणें वाची नित्य...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्‍ठतसे ॥१॥

जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥

जनीचे आवडे जयासी वचन । तयासी नारायण कृपा करी ॥३॥

पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP