मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
प्रेमभावें तुह्मी नाचा । ...

संत जनाबाई - प्रेमभावें तुह्मी नाचा । ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


प्रेमभावें तुह्मी नाचा । रामरंगें रंगो वाचा ॥१॥

हेंचि मागों देवाजीला । आवडी शांती खरें बोला ॥२॥

जैसी माय तान्हयातें । खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥

तेंवि तुह्मी संतजना । सर्वी धरावी भावना ॥४॥

हरि कोठवळा झाला । म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP