मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
देहभाव सर्व जाय । तेव्हां...

संत जनाबाई - देहभाव सर्व जाय । तेव्हां...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥

तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥

ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥

त्या एकीं एक होतां । दासी जनी कैंचि आतां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP