मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
एक प्रहर रात्र झाली । फेर...

संत जनाबाई - एक प्रहर रात्र झाली । फेर...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्‌ठलाची आली ॥१॥

नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं उभा कोण आहे ॥२॥

प्रभा घरांत दाटली । एक सराद सुटली ॥३॥

एकमेकां आलिंगन । नामा म्हणे जनी धन्य ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP