मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
ऐसा वर देई हरी । गांई नाम...

संत जनाबाई - ऐसा वर देई हरी । गांई नाम...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ऐसा वर देई हरी । गांई नाम निरंतरीं ॥१॥

पुरवीं आस माझी देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥२॥

हेंचि आहे माझे मनीं । कृपा करीं चक्रपाणी ॥३॥

रुप न्याहाळूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥

उदाराच्या राया । दासी जनी लागे पायां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP