मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
आतां पुरे हा संसार । कोठे...

संत जनाबाई - आतां पुरे हा संसार । कोठे...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥

सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥

नारिरुप होउनी हरी । माझें न्हाणें धुणें करी ॥३॥

राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥

ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP