मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
आले वैष्णवांचे भार । दिले...

संत जनाबाई - आले वैष्णवांचे भार । दिले...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आले वैष्णवांचे भार । दिले हरिनाम नगार ॥१॥

अवघी दुमदुमली पंढरी । कडकडाट गरुडपारीं ॥२॥

टाळ मृदंग धुमाळी । रंगणीं नाचे वनमाळी ॥३॥

ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP